
light pollution
esakal
वर्षा गजेंद्रगडकर
अनावश्यक किंवा अयोग्य प्रकाशनिर्मितीमुळे प्रकाश प्रदूषणात प्रचंड भर पडते. त्यामुळे रात्रीचा चांदण्यांचा प्रकाश पूर्णपणे प्रभावहीन होतो, खगोलशास्त्रीय संशोधनात अडथळे येतात, अनेक परिसंस्थांचं संतुलन बिघडतं, ऊर्जेचा अपव्यय होतो आणि मानवी आरोग्यही धोक्यात येतं. कृत्रिम प्रकाशामुळे विशेषतः निशाचर सजीवांवर प्रतिकूल परिणाम होतो.
दि वाळी काही दिवसांवर आली आहे. तेजाचा गर्भ वागवणाऱ्या काळोख्या रात्रींचा हा उत्सव! दारात, अंगणात दिवे लावून नक्षत्रजडित रात्रींचं सौंदर्य साजरं करणाऱ्या या उत्सवाची वाट आपण दरवर्षी आतुरतेनं पाहत असतो.गेल्या काही दशकांपासून दिवाळीच्या मुळाशी असलेलं काळोख्या रात्रींचं वैभव कमी होत चाललं आहे. आणि याला कारण आहे, सतत वाढत चाललेलं प्रकाशाचं प्रदूषण. अतिरिक्त कृत्रिम प्रकाशामुळे होणारं हे प्रदूषण शहरीकरणासोबत गेल्या पस्तीस-चाळीस वर्षांत हळूहळू वाढत गेलं आहे.