
वाचन करणे तसे कठीण असले तरी ते वाचून वाचून सोपे होत जाते आणि आपली एकाग्रता वाढत जाते. याउलट फोनवर स्क्रोल केल्याने निव्वळ वरवरचे वाचन होते, एकाग्रता कमी कमी होत जाते आणि तात्पुरत्या ट्रेंड किंवा चुकीच्या माहितीवर अवलंबून राहण्याची आपल्याला सवय लागते. म्हणूनच विवेकबुद्धीने निवड करा आणि दररोज काही वेळ वाचन करा!
बहुतेक कुटुंबांसाठी वाचन हे ५०० वर्षांचेही जुने नाही; परंतु ते आपल्याला प्राण्यांपासून वेगळा करणारा आणि सर्जनशीलता अन् नवनिर्मिती करण्याची क्षमता निर्माण करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. चला, एक छोटासा प्रयोग करूया... दररोज आपण शाश्वत माहितीवर आणि क्षणभंगुर माहितीवर किती वेळ घालवतो, हे तपासून पाहूया.