
Ethics case study corruption
esakal
अभिजित मोदे
तुम्ही एक तपास अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले आहात, जिथे सरकारी अधिकारी वरपासून तळापर्यंत स्कॅममध्ये सामील आहेत. असे म्हणतात की स्कॅममध्ये वरिष्ठ मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या अतिशय जवळचे लोक आहेत. या स्कॅममध्ये सामील असेलेल्या व्हिसलब्लोअर्सच्या हत्या झाल्या आहेत, ज्यात तपास अधिकारी आणि न्यायाधीशांचाही समावेश आहे.
राष्ट्रीय स्तरावर ही बातमी आली, पण आता मीडिया किंवा नागरी समाजाकडून काहीच पाठिंबा मिळत नाही. तुमच्या कुटुंबातील सदस्य तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी बदली घ्या असे विनंती करत आहेत. मित्र तुमच्या सुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त करतात. अशा कठीण परिस्थितीत, तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत? त्यांच्या फायदा आणि तोट्यांची चर्चा करा. तुम्ही कोणता पर्याय निवडाल, हे तपशीलवार स्वरूपात नीट स्पष्ट करा.