

Global Political Ethics
esakal
लेखक : अभिजित मोदे
आंतरराष्ट्रीय संबंधांमधील नैतिकता म्हणजे देशांनी आपल्या परराष्ट्र धोरणात, आंतरराष्ट्रीय व्यवहारात आणि जागतिक समस्यांच्या निराकरणात न्याय, मानवता, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी यांसारख्या मूल्यांचे पालन करणे होय. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात देश केवळ स्वतःच्या हिताचा विचार करून निर्णय घेत नाहीत, तर त्या निर्णयांचा इतर देशांवर आणि संपूर्ण जगावर काय परिणाम होईल याचाही विचार करावा लागतो. या प्रक्रियेत नैतिकता (Ethics) महत्त्वाची भूमिका बजावते.
आंतरराष्ट्रीय संबंधांमधील नैतिकता ही योग्य आणि अयोग्य वर्तनाचे मार्गदर्शन करणारी मूल्यव्यवस्था आहे. प्रत्येक देश आपल्या राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो; परंतु हे करताना इतर देशांचे अधिकार, सार्वभौमत्व आणि मानवतावादी मूल्ये यांचा आदर करणे आवश्यक असते. नैतिकता देशांना केवळ शक्ती आणि स्वार्थाच्या आधारावर नव्हे तर न्याय, सहकार्य आणि शांततेच्या आधारावर निर्णय घेण्यास प्रेरित करते.
उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली. यामागील उद्देश केवळ राजकीय सहकार्य नसून जागतिक शांतता आणि मानवी मूल्यांचे संरक्षण हा होता.