
ब्जाधीश उद्योगपती अन् ‘ॲमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेज यांच्या भव्यदिव्य विवाहसोहळ्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगली होती. इटलीतील पर्यटनासाठी प्रसिद्ध अशा व्हेनिस शहरात जगभरातील अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत बेझोस बोहल्यावर चढणार होते; मात्र त्यांचा लग्नसोहळा नुकताच दुसरीकडे हलवण्यात आला. बेझोस यांच्या लग्नाचे ठिकाण ठरल्यापासून व्हेनिसमधल्या काही सामाजिक संस्था आणि नागरिकांनी त्याविरोधात आंदोलने केल्याने त्यांनी माघार घेतली. लग्नसोहळ्यादरम्यान व्हेनिसच्या कालव्यांमध्ये आम्ही मगरी सोडू, अशा धमक्या आंदोलनकर्त्यांनी दिल्याने त्यांनी अखेर विवाहस्थळच बदलण्याचा निर्णय घेतला...
दुसऱ्या एका घटनेत, गेल्या आठवड्यात पॅरिसमधल्या लुव्ह्र म्युझियममध्ये काम करणाऱ्या कामगारांनीही अचानक आंदोलन केले. परिणामी, प्रशासनाला दिवसभर म्युझियम बंद ठेवावे लागले. पर्यटकांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागले. शेवटी प्रशासनाने पर्यटकांना तिकिटाचे पैसे परत केले...