Premium|Europe Heatwave Crisis : हवामान बदलाचा इशारा; युरोपसमोर उष्णतेचे वाढते संकट

Rising Heat Deaths : युरोपमध्ये वाढत्या उष्णतेच्या लाटांमुळे हजारो मृत्यू, आरोग्य व्यवस्थेवर ताण आणि आर्थिक नुकसान वाढत आहे. हवामान बदलाचा हा परिणाम आता सार्वजनिक आरोग्य व धोरणांसमोरील गंभीर आव्हान ठरत आहे.
Europe Heatwave Crisis

Europe Heatwave Crisis

esakal

Updated on

डॉ. मालिनी नायर - nairmalini2013@gmail.com

उन्हाळ्यामुळे आपल्याला फक्त अस्वस्थ वाटते, असा एक गैरसमज असतो. वादळाने इमारती पडू शकतात, पुराने रस्ते वाहून जातात, वणव्यामुळे जंगले उद्ध्वस्त होतात तसे उष्णतेच्या लाटेमुळे काहीही दिसून येत नाही; मात्र तरीही उष्णतेच्या लाटा सध्या युरोपचा सर्वात मोठा पर्यावरण धोका बनत आहेत.

यंदाच्या वर्षी मे आणि जूनमध्ये युरोपला कधी नव्हे तेवढ्या उष्णतेचा सामना करावा लागला. त्यामुळे उष्णतेच्या लाटेकडे फक्त हवामान बदल म्हणून न पाहता सार्वजनिक धोरणविषयक इशारा म्हणून ते गांभीर्याने घ्यायला हवे. नेहमी उन्हाळा सर्वोच्च पातळीला असताना जेवढे तापमान असते तेवढे स्पेन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड, इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये मे महिन्यातच आले होते. अनेक विभागांत पारा नेहमीच्या सरासरीपेक्षा १० ते १६ अंश सेल्सिअसने अधिक वर गेला होता. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता तर जास्त होतीच; पण त्याची वेळ चक्रावून टाकणारी होती. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक माणसांचा मृत्यू झाला.

फ्रान्समध्ये उष्णतेच्या लाटेने अनेकांचा मृत्यू ओढवला. स्पेनमध्ये २०१५ पासून अधिकृतरीत्या उष्णतेच्या लाटेवर लक्ष ठेवण्यास सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत तेथे सर्वात जास्त उन्हाळी मृत्यू मे महिन्यात नोंदवले गेले. रुग्णालये तसेच आणीबाणीच्या सेवांना तापमानवाढीच्या परिस्थितीला अपेक्षेपूर्वी अनेक आठवडे आधीच तोंड द्यावे लागले. त्यामुळे संपूर्ण युरोप खंडातील आरोग्यसेवांनी सावधानतेचा इशारा दिला होता. तरीही हे, काही दिवसांचे नेहमीपेक्षा जास्त असह्य तापमान होते, असे म्हणून सोडून देण्यापेक्षाही यामागील खरी गोष्ट जास्त गंभीर आहे.

ही उष्णतेची लाट म्हणजे, युरोपसमोरील वाढत असलेल्या अडचणींमधील एक नवा धडा आहे... पण तो पूर्णपणे मान्य करण्यास युरोप अजूनही तयार नाही. उष्णतेची लाट ही कधीतरीच होणारी गैरसोय नाही; तर ती २१व्या शतकातील सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक स्थिती यांच्यासमोरील नियमित गंभीर प्रश्न झाला आहे. या प्रश्नाची भयावह आकडेवारी विषण्ण करणारी आहे.

Europe Heatwave Crisis
Premium|Gen-Z Lifestyle Diseases : जेन-झी पिढीला ग्रासतोय 'सायलेंट किलर'; स्क्रीनचा अतिवापर आणि चुकीचा आहार तुमच्या मुलांचे भविष्य कसे धोक्यात आणतोय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com