
स्नेहल बाकरे
फर्निचरचा इतिहास म्हणजे काळाच्या प्रवाहात गरजेनुसार उदयास आलेल्या सौंदर्य व संस्कृतीच्या सांगोपांग विकासाची कथा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जन्माला आलेल्या विविध शैलींनी फर्निचरला सर्जनशीलतेची जोड दिली. भारतात प्रत्येक प्रांतानं आपल्या प्रादेशिक रचनेनुसार व परंपरेनुसार फर्निचरला एक खास रूप व वैशिष्ट्य प्रदान केलं.
फर्निचर हा शब्द फ्रेंच भाषेतून जन्माला आला. मध्ययुगीन काळात फ्रेंच भाषेतल्या ‘Fourniture’ म्हणजे ‘सज्ज करणे’ या शब्दापासून याची निर्मिती झाली. पुढे लॅटिनमध्ये ‘Furnire’ व नंतर इंग्रजीत ‘Furniture’ हा शब्द उदयास आला. काळाच्या ओघात हा शब्द खुर्ची, टेबल, पलंग, कपाट अशा वस्तूंच्या संदर्भात जगभरात वापरला जाऊ लागला.