
प्रसाद नामजोशी
मनीपेनीचं सगळ्यात क्रांतिकारी म्हणावं असं चित्रण नेओमी हॅरिसनं केलं. काळ बदलला होता आणि इऑन फिल्म्सनं पहिली कृष्णवर्णीय मनीपेनी प्रेक्षकांपुढे आणली होती. नेओमी ही मिस मनीपेनीची भूमिका साकारणारी पहिली कृष्णवर्णीय अभिनेत्री तर आहेच, पण एमची सेक्रेटरी होण्यापूर्वी बॉन्डबरोबर प्रत्यक्ष कामगिरीवर दिसलेलीही ती पहिलीच मनीपेनी आहे.
जेम्स बॉन्डचा निर्माता इऑन फ्लेमिंग याची पहिली कादंबरी होती कसिनो रोयाल. ही त्यानं वयाच्या ४४व्या वर्षी लिहिली. मुळात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांच्या नेव्हल इंटेलिजन्स डिव्हिजनमध्ये नोकरी करत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय कटकारस्थानं, वेगवेगळ्या राष्ट्रांची धोरणं, युद्ध या सगळ्या गोष्टी त्याच्या परिचयाच्या होत्या.