Selfish Altruism
esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium|Selfish Altruism: उत्क्रांतीतील स्वार्थी परोपकार
Reciprocal Altruism: रॉबर्ट ट्रिव्हर्स आणि रिचर्ड डॉकिन्स यांनी उत्क्रांतीतील परोपकार निःस्वार्थी नसून जीन व मीम टिकवण्यासाठीची रणनीती असल्याचे सांगितले. परस्पर सहकार्य, संस्कृती आणि धर्म हे या उत्क्रांतीच्या सूत्रातून उभे राहिले
मीम संकल्पनेचा खरा जनक आहे रिचर्ड डॉकिन्स. डॉकिन्सनेच मीम हा शब्द लोकप्रिय केला. त्याचा खरा अर्थ आहे, सांस्कृतिक माहितीचे घटक एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे प्रवाही होणे. जसे जीन जैविक माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेत असतात तसे हे मीम कल्पना, गाणी, श्रद्धा, परंपरा असे सांस्कृतिक माहितीचे घटक एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेत असतात. डॉकिन्सच्या मते, धर्म हासुद्धा एक शक्तिशाली मीम आहे आणि तो विश्वास, परंपरा आणि विधी यांच्या रूपाने टिकून राहतो...

