Mobile Use Time Wasting
esakal
Premium|Mobile Use Time Wasting : टाईम इस मोअर दॅन मनी
विठ्ठल काळे mailvitthalkale@gmail.com
आपण नेहमी आपल्याला आवश्यक असतं त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक प्रमाणात मोबाईल वापरतो. खरं तर माणसाचा वेळ वाचावा म्हणून मोबाईलची निर्मिती केली गेली; परंतु आज आपला सर्वात जास्त वेळ त्यामुळेच वाया जातो. कितीतरी वेळा आपण उगाचच मोबाईल वापरतो,
काही कारण नसताना...
वसभराचा वेळ कसा जातो हेच कळत नाही यार. दिवस संपत आल्यावर आपल्या खूप गोष्टी करायच्या राहिल्यात असं लक्षात येतं; पण वेळ निघून गेलेली असते. उद्या तरी करू या, या विचाराने मी झोपतो. उद्याही तेच होतं. काय करावं तेच कळत नाही. वेळच पुरत नाही. कितीही प्रयत्न केला तरी मला माझ्या वेळेचं व्यवस्थापन करता येत नाही. काय करावं रे?’ मी मनमोकळेपणाने माझ्या मित्राला बोलत होतो. हा माझा मित्र म्हणजे वेळेचं नियोजन करण्यामध्ये एकदम तरबेज. काळ कितीही झपाट्याने बदलू द्या, रोज नवनवीन तंत्रज्ञान येऊ द्या; परंतु हा आपल्या वेळेचं नियोजन अगदी योग्य पद्धतीने आणि काटेकोरपणे करतो. आयुष्यात सर्वात मौल्यवान कोणती गोष्ट असेल, तर ती आहे वेळ, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच आणि त्या वेळेचंच नियोजन जमलं नाही, तर क्षमता असूनही आयुष्य वाया जातं.

