Premium|Far East History : पूर्व आशियाला ‘अतिपूर्व’ का म्हटले गेले? व्यापार, धर्मप्रसार आणि युरोपीय सत्ताविस्ताराची रंजक कहाणी

From Far East to Greater India : ‘अतिपूर्व’पासून ‘दक्षिण-पूर्व आशिया’ आणि ‘विशाल भारत’पर्यंतची संज्ञा बदलण्यामागे युरोपीय विस्तारवाद, औद्योगिक क्रांती, व्यापार, धर्मप्रसार आणि बदलत्या भौगोलिक आकलनाचा मोठा इतिहास दडलेला आहे.
Far East History

Far East History

esakal

Updated on

डॉ. पुलिंद सामंत - sakal.avtaran@gmail.com

पूर्व आशियाला ‘अतिपूर्व’ म्हणण्यापासून ‘दक्षिण-पूर्व आशिया’ आणि पुढे ‘विशाल भारत’ म्हणून ओळखले जाण्यापर्यंतचा प्रवास केवळ नामकरणाचा इतिहास नाही. युरोपीय सत्तांच्या विस्ताराबरोबर बदलत गेलेल्या जगाच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आकलनाचाही तो मागोवा आहे.

आग्नेय असो वा ईशान्य, एकूण पूर्व आशिया पाश्चात्त्याच्या दूरस्थ नजरेतून ‘अतिपूर्व’ होता. १८व्या आणि १९व्या शतकात युरोप खंडात आकारास आलेल्या औद्योगिक क्रांतीतून घडून आलेल्या यंत्र-तंत्रसंबंधी पुष्टीकरणामुळे आणि तत्संबंधित परस्पर-चढाओढीतून निर्माण झालेल्या वाणिज्यिक ईर्षेमुळे बहुतेक सर्वच तत्कालीन युरोपीय देशांमध्ये उर्वरित जगाला गवसणी घालण्याची आस निर्माण झाली होती. त्या आसेला, त्यांच्यापैकी काहींनी एक शतकभर अगोदर पूर्वेकडच्या मसाल्यांच्या व्यापाराच्या निमित्ताने घेतलेल्या जगाच्या धांडोळ्याची / चाचपणीची ऊर्फ संबंधित गृहपाठाची उत्तम पार्श्वभूमी होती आणि त्याहून पूर्वी म्हणजे १५व्या शतकात, ख्रिस्ती-मताच्या प्रसारासाठी पूर्ण जग पादाक्रांत करण्यासाठी त्यांच्यापैकी दोघांमध्ये (पोर्तुगाल आणि स्पेन) जगाची वाटणी, युरोपला केंद्रस्थानी ठेवून पूर्व-पश्चिम अशी, तत्कालीन काथोलिक पंथ-पीठाच्या पीठाधीशांनी आशीर्वादासकट करून दिली होती. पुढे युरोपातील देशोदेशी आपापले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ख्रिस्ती-मताच्या अन्य पंथांनी तेच धोरण कमी-अधिक प्रमाणात जगात सर्वत्र संचार करत असताना अंगीकारले. अशा या आक्रमक आणि महत्त्वाकांक्षी युरोपीय दर्यावर्दींनी त्यांच्या मुशाफिरीच्या सुरुवातीच्या काळात पूर्व आशियाला ‘अतिपूर्व’ (Far East) हे नामाभिधान दिले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com