Premium|Father’s Health Emergency : मिटलेल्या पापणीत माझी ओळख नेली नाही...

Emotional Hospital Experience : वडिलांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर ते पुन्हा चालू-बोलू शकतील का, या प्रश्नाने मिलिंद शिंदे अस्वस्थ झाले. डॉक्टरांचे अनिश्चित उत्तर, आयसीयूतील यंत्रांचा आवाज आणि वडिलांच्या प्रकृतीची धाकधूक यांतून मुलाच्या मनातील भीती आणि असहायता तीव्रपणे व्यक्त होते.
Father’s Health Emergency

Father’s Health Emergency

esakal

Updated on: 

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

वडिलांबरोबर गावी जायचा संकल्प केलेल्या मिलिंद यांना एक फोन आला आणि त्या दिवसाचा नूरच बदलला. नियतीचा खेळ विचित्र होता. आपले कोण आणि परका कोण? याची परीक्षा होण्याचा तो कालखंड... अखेरचा निरोप इतक्या विचित्र परिस्थितीत. दवाखान्यात दाखल केलेल्या वडिलांच्या अंतिम प्रवासाचा मनावरचा ओरखडा न मिटणारा... काय घडलं, माणुसकीचा गहिवर आणि तीच पणाला लावणारी परिस्थिती सारंच अघटित आणि अतर्क्य...

खूपच क्रिटिकल आहे...

मग आत्ताच ऑपरेशन..? त्याचा काय रिझल्ट..?

मी घायकुतीला येऊन डॉक्टरांना विचारलं..

आत्ता जे ऑपरेशन केलं... त्याचा काही फायदा झाला की नाही...?

हे बघा, तसं लगेच सांगता येत नाही. ड्युरिंग ऑपरेशन त्यांचं बीपी कमी झालं. त्यामुळे ऑपरेशनमध्ये प्रॉब्लेम आला.. lets see..

lets see..?

डॉक्टर निघून जायला निघाले. त्यांना अडवून मी म्हणालो, क्रिटिकल आहेत ते तुम्ही सांगितलं पण ते चालू बोलू शकतील ना..?

न्युरोची केस आहे. असं नाही सांगता येत. lets see...

नसांमध्ये स्फोट घडू लागले. हा माझा बाप, याला जर चालता-बोलता नाही आलं तर हा माणूस जगणंच त्यागेल... स्वतःहून स्वतःला संपवेल.

डॉक्टर निघून गेले.

स्ट्रेचर आयसीयूच्या दिशेने धावू लागलं.

सोबत आमचे पाय..

पटापट यंत्राचं चिमटे वडिलांच्या बॉडीला चिकटू लागले. बटणं चालू झाली.. यंत्र निर्वाकार घोंगावू लागली. एक खटका ओढला...

पोट हलू लागलं..

शांतता चलबिचल करू लागली..

काय झालं काय होतं...?

Father’s Health Emergency
CJP Protest Pune: पुण्यात ‘सीजेपी’कडून; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com