Premium|Study Room : फिफा विश्वचषक २०२६; फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेचे नवे विस्तारित स्वरूप, ४८ संघांचा सहभाग, तीन यजमान देश, ऐतिहासिक विक्रम, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक फुटबॉल महोत्सवाचा सविस्तर आढावा.
FIFA World Cup 2026

FIFA World Cup 2026

esakal

Updated on

लेखक : प्रतिक बाबर

फुटबॉल हा केवळ एक खेळ नसून जगभरातील अब्जावधी लोकांच्या भावनांचा महासागर आहे. दर चार वर्षांनी होणारा 'फिफा' (FIFA) विश्वचषक हा संपूर्ण जगाला खिळवून ठेवणारा सर्वात मोठा क्रीडा महोत्सव मानला जातो. ११ जून २०२६ पासून सुरू झालेला 'फिफा' विश्वचषक २०२६ हा फुटबॉलच्या इतिहासातील अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण, ऐतिहासिक आणि अभूतपूर्व सोहळा ठरत आहे. जागतिक एकात्मता, आधुनिक तंत्रज्ञान आणि क्रीडा कौशल्याचा अनोखा संगम या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला अनुभवता येत आहे.

स्पर्धेचे स्वरूप

'फिफा' विश्वचषक २०२६ हा फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक ठरला आहे. इतिहासात प्रथमच ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन यजमान देशांतील १६ शहरांमध्ये संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. १९९८ पासून ३२ संघांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा यंदा विस्तारित स्वरूपात खेळवली जात असून, यामध्ये एकूण ४८ संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे सामन्यांची संख्या ६४ वरून १०४ वर पोहोचली असून स्पर्धेचा कालावधी ३९ दिवसांचा आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची एकूण संख्या १,०४८ इतकी असून हा आजवरचा नवा विक्रम आहे.

मेक्सिको सिटीतील ऐतिहासिक 'एस्टादिओ अझ्टेका' (Estadio Azteca) स्टेडियमने १९७०, १९८६ आणि २०२६ अशा तीन वेगवेगळ्या विश्वचषकांच्या उद्घाटन सामन्यांचे यजमानपद भूषवण्याचा अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. अंतिम सामना न्यू जर्सी येथील 'मेटलाइफ स्टेडियम'मध्ये खेळविण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com