
सुलभा तेरणीकर
saptrang@esakal.com
ध्येयवेड्या माणसांनी एकत्र येणं संस्था निर्माण करणं आणि मतभेद झाल्यानंतर दूर होऊन स्वतःचा मार्ग शोधणं हा नियम चित्रपट संस्थांच्या बाबतीत सर्रास दिसला. ‘बॉम्बे टॉकीज’मधून शशधर मुखर्जी, अशोककुमार, रायबहाद्दूर चुनीलाल अशी माणसं बाहेर पडली आणि १९४३ मध्ये गोरेगाव (पश्चिम) येथे फिल्मिस्तान स्टुडिआत स्वतंत्र काम करण्यास सुरुवात केली. याचा अर्थव्यवहार रायबहाद्दूर चुनीलाल बघत. फिल्मिस्तान १९४४चा पहिला चित्रपट होता, चल चल रे नौजवान.
अशोक कुमार, नसीनबानू या जोडीचा. १९५० मध्ये रायबहाद्दूर यांचे अकस्मात निधन झाले आणि पुन्हा नवीन राज्य आलं, तोलाराम जालान या कलकत्याच्या बड्या धनाढ्य व्यापाऱ्यांचं पण तोपर्यंत फिल्मिस्तानने काही चित्रपट दिले आणि सोन्यासारखी माणसंही.... सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन, गीता रॉय अशी अविस्मरणीय काम करणारी.