Premium|Tata Resources and Energy Fund : उच्च जोखीम पण दमदार परतावा; टाटा रिसोर्सेस अँड एनर्जी फंडातून कमोडिटी सायकलचा लाभ कसा घ्यावा?

Global metal market trends and LME index : जागतिक भू-राजकीय तणाव आणि विस्कळीत पुरवठा साखळीमुळे लोह, कच्चे तेल आणि बेस मेटल्सच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कमोडिटी सायकल आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेणे आवश्यक आहे.
Tata Resources and Energy Fund

Tata Resources and Energy Fund

esakal

Updated on

वसंत कुलकर्णी-vasant@vasantkulkarni.com

जिन्नस आणि वस्तूंशी संबंधित कंपन्यांच्या शेअरच्या भावात अलीकडे चांगली वाढ झाली आहे. ज्यामध्ये लोह खनिज, कच्चे लोखंड, पोलाद कोबाल्ट, टायटॅनियम, टंगस्टन, मॅंगनीज यासह कच्चे तेल, सिमेंट-केंद्रित कंपन्या यांचा समावेश आहे. ऊर्जा बाजारपेठेतील अस्थिरता, जागतिक स्तरावर भू-राजकीय तणाव, कमकुवत होत असलेला डॉलर आणि विस्कळित झालेल्या पुरवठा साखळीच्या पार्श्वभूमीवर जिन्नस हा केंद्रबिंदू मानून गुंतवणूक करणाऱ्या कमोडिटी फंडात वाढ झाल्यामुळे या बाजारांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

जिन्नस आणि वस्तूंच्या किमती एका विशिष्ट आवर्तनात फिरत असतात. याचा अर्थ असा, की कमोडिटी फंडांमध्ये गुंतवणूक केल्यावर मिळणारा परतावा गुंतवणुकीच्या वेळेवर (आवर्तनाच्या कोणत्या टप्प्यात गुंतवणूक करता) यावर अधिक अवलंबून असतो आणि फंड व्यवस्थापकाच्या कौशल्यावर कमी अवलंबून असतो. त्या मापदंडासह, आपण उद्योगाच्या तीन घटकांकडे पाहतो, जेणेकरून ते ‘कमोडिटी सायकल’मधील कोणत्या टप्प्यात आहेत, याचे मूल्यांकन करू शकतील. कोरोनापश्चात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. इराणबरोबर युद्ध सुरू झाल्याने पुरवठासाखळी विस्कळीत झाल्याने इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला ‘बेस मेटल’मध्ये वाढ झाली आहे. ‘एलएमईएक्स’ (लंडन मेटल एक्स्चेंज) हा निर्देशांक जो ॲल्युमिनियम, तांबे, जस्त, शिसे आदी धातूंच्या किमतीचा मागोवा घेतो, तो जानेवारी २०२६ मध्ये त्याच्या कोविडनंतरच्या उच्चांकाला मागे टाकत आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेला. फेब्रुवारी २०२६ पर्यंत हा निर्देशांक पाच टक्क्यांनी वधारला आहे आणि तो मागील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे. कमकुवत डॉलरमुळे ईव्ही, बॅटरी, ऊर्जा साठवणूक आणि पुरवठ्यातील कमतरता यांसारख्या मागणी घटकांना चालना मिळाली आहे. परंतु, युद्धाला तोंड फुटल्यानंतर डॉलर इंडेक्स वधारला असल्याने आणि येत्या काळात अमेरिकी ‘फेड’कडून अपेक्षेपेक्षा कमी व्याजदरकपात होण्याची शक्यता आणि चीन व जागतिक अर्थव्यवस्थेकडून कमी होणारी मागणी यामुळे बेस मेटलमध्ये आणखी तेजी टिकू शकणार नाही. गेल्या सहा महिन्यांत ‘निफ्टी इंडेक्स’मध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com