मुंबई : तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी कुणाला डेट केलंय का..? केलं असेल तर या पहिल्या भेटीत तुम्हीच खरंच किती खरं वागलात..? या अवघडलेल्या परिस्थितीत खरंच आपण आहोत तसं स्वतःला दाखवणं शक्य असतं..?
जनरेशन झेडची रसिका म्हणते.. माझ्या पहिल्या डेटबाबत मी खूप उत्सुक होते पण दाखवताना मात्र मी असं दाखवलं की मी साध्या गप्पा मारायला भेटले आहे. त्याने मला पहिल्याच भेटीत विचारलं की, तुझं माझ्याबद्दल काय मत आहे..? फिजिकल इंटिमसी बद्दल तुला काय वाटतं..? मी यावर खूप सावध उत्तरं दिली. मला वाटतं मनात काहीही असेल तरीही इतक्या लगेच यावर आपण मत नाही द्यायला हवं.
खूपदा समोरच्याकडून येणाऱ्या नकाराची भीती, होणारे समज गैरसमज यातून अनेक जण पहिल्या भेटीत खोटं बोलतात. 'जनरेशन झेड' च्या भाषेत सांगायचं झालं तर 'गुडी-गुडी' वागत राहतात. पण एकीकडे आपली मूल्य आपल्याला सांगतात की कोणत्याही नात्याची वीण ही खरेपणावर आधारित असावी आणि दुसरीकडे नकाराची शक्यता, समोरच्यावर शंभर टक्के विश्वास टाकायची भीती या गोष्टी आपल्याला मागे खेचत असतात. अशा वेळी नात्याच्या खरेपणाला प्राधान्य द्यायचं की खोटं वागायचं या द्वंद्वात तुम्हालाही अडकल्यासारखं होतं का..?
अशा परिस्थितीत कसं वागायला हवं..? प्राधान्य कशाला द्यायला हवं.. खऱ्याला की खोट्याला..? यामागचं मानसशास्त्र काय सांगतं..? आणि संशोधनाचे आकडे काय सांगतात..? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून..