
आपण भारतीय लोक गुंतवणुकीबद्दल बोललो की एक-दोन गोष्टींपलीकडे आपल्याला फार काही सुचत नाही. काही लोकांना आम्ही विचारलं कशात करता तुम्ही गुंतवणूक? तर, अभिजित म्हणतो सोनं घेतो! ध्रुव म्हणाला घर घेतलं मी आत्ताच. राघव म्हणाला म्युच्युअल फंड आणि माया म्हणाली FD.
आपल्या डोळ्यासमोर सुद्धा याच ४ गोष्टी येतात ना? पण आज आपण सोनं आणि घर हे दोन पर्याय बाजूला काढणार आहोत बरंका! आणि दोन नेहेमीच्या द्वंद्वात टाकणाऱ्या पर्यायांबद्दल जाणून घेणार आहोत. एक म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आणि दुसरं म्हणजे म्युच्युअल फंड. हे दोन्ही पर्याय इतके लोकप्रिय आहेत की वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाही.
'मनिमूव्हड २०२५' नावाच्या एका अहवालातून कळलंय की २०२४ मध्ये ६२% लोकांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर ५७% लोकांनी एफडीची वाट धरली. म्हणजे, दोघांचीही क्रेझ काही कमी नाही! पण मग प्रश्न पडतो, आपल्यासाठी नक्की काय बेस्ट आहे? चला तर मग, जरा सविस्तरपणे या दोन्हीबद्दल जाणून घेऊ आणि तुमचा निर्णय पक्का करूनच टाकू! अर्थात, 'सकाळ प्लस' च्या या लेखातून...