Premium|Imran Khan Adiala Jail : पाकिस्तानात इम्रान खानविरोधात लष्करी डावपेच, तुरुंगातूनही जनतेचा वाढता पाठिंबा

Pakistan former Prime Minister : इम्रान खान यांच्या १९९२ मधील क्रिकेट विश्वचषक विजयापासून ते कॅन्सर हॉस्पिटलची स्थापना, राजकारण प्रवेश, पंतप्रधानपद सोडणे आणि सध्या तुरुंगात असतानाही त्यांची असलेली लोकप्रियता, तसेच लष्करप्रमुखांशी असलेले त्यांचे तणावपूर्ण संबंध यावर हा लेख आधारित आहे.
Imran Khan Adiala Jail

Imran Khan Adiala Jail

esakal

Updated on

जतीन देसाई- jatindesai123@gmail.com

एक कॅप्टन म्हणून इम्रान खान यांनी १९९२ मध्ये पाकिस्तानला क्रिकेटचा विश्वचषक जिंकून दिला. १९९४ मध्ये आपल्या आईची आठवण म्हणून त्यांनी लाहोरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल स्थापन केले. साहजिकच ते तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर होते. १९९६ मध्ये त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. भ्रष्टाचार संपवण्याच्या लोकप्रिय घोषणा त्यांनी दिल्या. पुढे ते पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. लष्करापेक्षा आपण मोठे आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याने त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले आणि ‘अतिरेकी’ राजकारणामुळे राजकीय मैदानात त्यांची विकेट गेली.

क क्रिकेटपटू म्हणून इम्रान खान पाकिस्तानात जेवढे लोकप्रिय होते त्याहून अधिक ते आज चर्चेत आहेत. इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाची खैबर-पख्तुनख्वा प्रांतात सत्ता आहे. संसदेच्या खालच्या सभागृहात इम्रान खान यांच्या नावाने जवळपास शंभर खासदार निवडून आले आहेत. २०२३च्या ऑगस्ट महिन्यापासून त्यांना रावळपिंडीमधील अडियाला तुरुंगात ठेवण्यात आले असले तरी त्यांच्या लोकप्रियतेची पाकिस्तान सरकार आणि लष्कराला भीती आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून इम्रान यांच्या प्रकृतीची आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजमाध्यमात चर्चा आहे. अफगाणिस्तानच्या एका वेबसाईटने त्यांच्या मृत्यूच्या दिलेल्या चुकीच्या बातम्यांमुळे प्रचंड अफवा पसरली... इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा आदेश असला तरी इम्रान यांच्या बहिणींना त्यांना तुरुंगात भेटू दिले जात नव्हते; पण पाकिस्तानात इम्रान यांच्या बाजूने असलेल्या प्रचंड सहानुभूतीमुळे इच्छा नसतानाही २ डिसेंबरला त्यांची बहीण डॉ. उझमा खान यांना तुरुंगात त्यांना भेटायला दिले गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com