
पृथ्वीवर साधारणतः चार ते २२ कोटी वर्षांपूर्वी लहान-मोठे शेकडो प्रकारचे डायनासोर प्राणी वावरत होते. त्यांच्याविषयी सर्व प्रकारचे संशोधन सुरू आहे; परंतु ते सोपे नसते. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. या सगळ्या धडपडीची माहिती.
वै ज्ञानिक संशोधन करताना बऱ्याच अडचणी येतात. एखादे दुर्लभ रसायन, महागडे उपकरण, पुस्तक, संदर्भ, सॉफ्टवेअर आदी मिळवताना संशोधकांची ससेहोलपट होते. काही अतिप्राचीन वस्तू वैज्ञानिक दृष्टीने अतिमौल्यवान असतात. त्यामध्ये डायनासोरच्या अवशेषांचा विशेष उल्लेख करायला पाहिजे. त्याचे संशोधन करताना तर काही वेगळ्याच समस्यांना तोंड द्यायची वेळ येते. पृथ्वीवर साधारणतः चार ते २२ कोटी वर्षांपूर्वी शेकडो प्रकारचे लहान-मोठे डायनासोर प्राणी वावरत होते.
टायरॅनोसॉरस रेक्स (रेक्स म्हणजे राजा) डायनासोर सहा ते सात कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर वावरत होते. आक्राळ-विक्राळ शरीरामुळे आणि मोठ्या अणुकुचीदार दातांमुळे असंख्य लोकांना त्याचं विशेष कुतूहल वाटतं. त्यांची लांबी १२.८ मीटर, उंची चार मीटर आणि वजन सात टन होते.