Premium|France Protests and Social Unrest : फ्रान्समधील हिंसक आंदोलनांनी कल्याणकारी अर्थव्यवस्थेपुढे उभे केले प्रश्न

France Protests and Welfare Economy : फ्रान्समधील महागाई, बेरोजगारी, विद्यार्थी आंदोलन आणि हिंसक निदर्शनांमुळे मॅक्रॉन सरकारसमोर आव्हाने उभी राहिली आहेत. कल्याणकारी अर्थव्यवस्था, नागरिकांच्या अपेक्षा आणि सामाजिक असंतोषाचा वेध घ्या.
France Protests and Social Unrest

France Protests and Social Unrest

esakal

Updated on: 

निळू दामले - sakal.avtaran@gmail.com

फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलन, वाढती महागाई, बेरोजगारी आणि हिंसक निदर्शनांनी केवळ मॅक्रॉन सरकारपुढेच नव्हे;

तर कल्याणकारी अर्थव्यवस्थेच्या मर्यादांपुढेही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा, सरकारची आर्थिक कोंडी आणि डावे-उजवे राजकारण यांतून निर्माण झालेला असंतोष हा केवळ फ्रान्सपुरता मर्यादित नसून, जागतिक लोकशाही व्यवस्थेपुढील गंभीर आव्हान ठरत आहे.

सिल्विया केल्वी गेली ४७ वर्षे पॅरिसच्या रिपब्लिक चौकात खाद्यपदार्थांचे दुकान चालवतेय. १८ ऑक्टोबरच्या सकाळी ती दुकान उघडायला गेली, तेव्हा ते उद्ध्वस्त झालेले पाहून ती मटकन खालीच बसली. आदल्या रात्री चौकात निदर्शने आणि दंगल झाल्याची बातमी तिने टीव्हीवर पाहिली होती. त्या बातमीचा संदर्भ खुद्द आपल्याच दुकानाशी असेल, अशी कल्पनाही तिने केली नव्हती. १७ ऑक्टोबरच्या रात्री पॅरिसभर काही लोकांनी उत्पात माजवला होता. दुकाने फोडली, लुटली आणि मोटारींना आगी लावल्या. पॅरिसमध्ये सुमारे दोन हजार दुकाने आणि कार्यालयांची नासधूस झाली होती.

कसा विचित्र प्रकार घडतो पाहा. १७ ऑक्टोबरच्या आठवड्यात लुई व्हिटॉन, हर्मेस इत्यादी कंपन्यांनी आपली दुकाने, शोरूम आणि कार्यालये जनतेसाठी खुली केली होती. आपली उत्पादने लोकांनी पाहावीत, ती कशी तयार केली जातात हे समजून घ्यावे, अशी त्यामागची कल्पना होती. साधारणपणे माणसे दुकानात खरेदी करण्यासाठी येतात आणि खरेदी करून निघून जातात. त्याऐवजी लोकांनी उत्पादनांची माहिती करून घ्यावी, डिझायनर आणि कारागिरांशी संवाद साधावा, अशी कंपन्यांची अपेक्षा होती.

Loading content, please wait...