
Freedom fighters of India
esakal
कारागृहामध्ये असताना ते पूर्णपणे बघण्याची विशेषतः जिथे स्वातंत्र्यवीरांना फाशी दिली ती पवित्र जागा, फाशी गेट पाहण्याची तीव्र इच्छा होती. स्वातंत्र्यवीरांचा फाशी गेट पाहायचा आहे, हे ऐकून कारागृह अधीक्षक मित्रा यांना आश्चर्य आणि कौतुक वाटलं. त्यांनी दुसऱ्याच दिवशी कारागृह बघण्याची व्यवस्था केली. अशा प्रकारची परवानगी त्यांच्याकडे प्रथमच कुठल्या कैद्याने बहुधा मागितली असावी.
परवानगी मिळाल्यानंतर मी आनंदून मनोमन त्यांचे आभार मानले. विनय लिमये या एका तरुण कैद्याची कारागृह दाखवण्याकरिता नेमणूक केली गेली. हा कैदी जेमतेम तिशीतला उच्च पदवीधर तरुण होता. आर्थिक गुन्ह्यातील आरोपाखाली सहा महिन्यांपूर्वी तो कारागृहात आला होता. त्याच्यावरील खटला सुरू असल्यामुळे तो अंडर ट्रायल होता. आधीच्या तुरुंग अधीक्षकांनी त्याची विद्वत्ता लक्षात घेऊन कारागृहाच्या व्यवस्थापनाला मदतीसाठी जबाबदारी त्याच्याकडे दिली होती. त्याने आम्हाला पूर्ण कारागृह दाखवलं.