
प्रवासात एखाद्या ठिकाणचं पाणी पोटाला सोसलं नाही की आपण, बिस्लेरी किंवा बाटलीबंद पाणी घेतो. पण खरोखरच हे पाणीतरी आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का?
विचार करण्याची वेळ आली आहे कारण, भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने नुकतंच बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर यांना अतिधोकादायक खाद्यपदार्थांच्या यादीत टाकलं आहे.
दुसरीकडे या बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर उद्योगाची भारतातली उलाढाल मात्र जोरदार वाढते आहे.