Premium|Future Investment Opportunities : आज अशक्य वाटणाऱ्या कल्पनांमध्ये दडलेल्या गुंतवणुकीच्या संधी

Future Investment Opportunities : आज अशक्य वाटणाऱ्या कल्पना उद्या उद्योगांचे स्वरूप बदलू शकतात. अशा नव्या संधी ओळखताना तंत्रज्ञान, सरकारी धोरणे, व्यावसायिक शक्यता आणि गुंतवणुकीतील जोखीम तपासणे महत्त्वाचे ठरते.
Future Investment Opportunities

Future Investment Opportunities

esakal

Updated on: 

विक्रम अवसरीकर - vikram.awsarikar@gmail.com

आज अशक्य, अव्यवहार्य किंवा हास्यास्पद वाटणारी एखादी कल्पना उद्या संपूर्ण उद्योगाचे स्वरूप बदलू शकते. अशा कल्पनांना सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखून त्यांच्यामागील तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, सरकारी धोरणे आणि व्यावसायिक शक्यता यांचा अभ्यास करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठ्या संधी मिळू शकतात. मात्र, प्रत्येक नवी कल्पना यशस्वी होतेच असे नाही. त्यामुळे कल्पनेतील नावीन्याबरोबरच तिची अंमलबजावणी, कंपनीची आर्थिक स्थिती आणि शेअरचा भाव यांचाही विचार करणे आवश्यक आहे. वेशीबाहेरच्या कल्पनांचा मागोवा घेताना संधी आणि सापळा यांतील फरक ओळखणे गरजेचे आहे...

मुलींच्या शिक्षणाची कल्पना महात्मा फुले यांनी मांडली, तेव्हा ती क्रांतिकारी होती. तत्कालीन प्रस्थापित समाजाच्या ध्यानीमनीही नसलेली ही गोष्ट होती. थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याच्या माध्यमातून अंधारावर मात करण्याचा मार्ग दाखवला, तेव्हा मानवी जीवनात मोठे परिवर्तन घडले. बिल गेट्स यांनी संगणकासाठी कार्यकारी प्रणाली आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्यापक व्यावसायिक शक्यता निर्माण केल्या, तेव्हाही तंत्रज्ञानाच्या जगात क्रांती झाली. एलॉन मस्क यांनी चालकाविना चालणाऱ्या गाड्या आणि पुन्हा पुन्हा वापरता येणाऱ्या रॉकेटच्या विकासाला चालना दिली. अशा कल्पनांनी केवळ संबंधित कंपन्यांचेच नव्हे, तर संपूर्ण उद्योगांचे स्वरूप बदलण्याची क्षमता दाखवून दिली. ज्या कल्पना सुरुवातीला बहुतांश लोकांच्या विचारविश्वातही नसतात, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी काही जण बारकाईने अभ्यास करतात, प्रयोग करतात आणि जोखीम स्वीकारतात. अशा कल्पना समाजात आणि बाजारपेठेत व्यापकपणे स्वीकारल्या जाण्यापूर्वीच त्यांच्यातील व्यावसायिक शक्यता ओळखणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, नवी कल्पना ओळखणे एवढेच पुरेसे नसते. तिचा विकास कसा होणार, तिला ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळणार, आवश्यक भांडवल कोठून येणार आणि त्या कल्पनेतून प्रत्यक्ष नफा कसा निर्माण होणार, याचाही अभ्यास करावा लागतो.

Loading content, please wait...