youtube creator economy
Esakal
पुणे – एका छोट्याश्या खेडेगावातून आलेला शुभम.. त्याने पत्रकारिता पुर्ण केल्यानंतर एक दोन ठिकाणी नोकरी केली. पण वर्क कल्चर न आवडल्याने, आपल्या विचार आणि नैतिक मुल्यांप्रमाणे काम न करता आल्याने अखेर वर्षभरातच त्याने त्या दोन्ही नोकऱ्या सोडल्या. त्याचा इतिहासाचा अभ्यास होता, राजकारणाची आवड होती म्हणून त्याने त्या विषयातले स्वत:चे युट्यूब चॅनेल सुरू केले. सुरूवातीच्या काळात तो रोज एक व्हिडिओ टाकत. त्याचे व्हिडिओ सुरूवातीच्या काळात चांगले चालले. त्याचे काही व्हायरल व्हिडिओ लाखांमध्ये देखील चालले. मात्र काही दिवसांत त्याचे व्हूज हळूहळू कमी झाले. व्हूज मिळत नाही म्हणून कंटेट नियमित टाकणंही कमी झालं. आज त्याच्याकडे १० हजार पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असुनही त्याचे व्हिडिओज हे हवे तसे चालत नाही. आता तो पुन्हा नोकरी करावी की जे आहे ते सुरू ठेवावं या द्वंद्वात अडकला आहे...
शुभमप्रमाणेच आज अनेक असे इंन्फ्युएंसर किंवा क्रिएटर्स असे आहेत की, ज्यांनी सुरूवात तर अगदी जोमाने केली पण आता व्हूज नाहीत म्हणून चॅनेल बंद केले. यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने निराश झाले आहेत.
याविषयात अनेक जागतिक पातळीवरच्या संस्थांचे अभ्यास प्रसिद्ध झाले आहेत. याचं भविष्य काय, सध्या भारतात किती इंन्फ्लुएंसर या माध्यमातून काय काम करतात, ही Creator Economy कसं काम करते आहे आणि यातून किती उत्पन्न मिळतं आहे, कोणत्या प्रकारचा कंटेट पाहिला जातो आणि कोणत्या भाषेत पाहिला जातो आहे याविषयी जागतिक पातळीवरील संस्थांचा अभ्यास काय सांगतो हे सगळं सविस्तर जाणून घेऊया सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून..