

Naxalite Surrender Constitution
esakal
ई. झेड. खोब्रागडे
ez_khobragade@reddifmail.com
नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपती याने नुकतेच मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्रत्याग करीत आत्मसमर्पण केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भारतीय संविधानाची प्रत दिली. नक्षलवाद्यांच्या हाती भारतीय संविधान आले, ही निश्चितच अतिशय सकारात्मक आणि आशादायक बाब आहे. आपला देश माओवाद व नक्षलवाद या दोन्ही विचारसरणींपासून पूर्णपणे मुक्त झाला पाहिजे.
१५ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील भूपतीसह तब्बल ६० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. याप्रसंगी नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात शस्त्रे दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हाती भारतीय संविधान सोपवले. माओवादी चळवळीचा प्रमुख नेता भूपतीचे आत्मसमर्पण ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक घटना मानली जाते. यापूर्वी छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात १७ ऑक्टोबरला जवळपास २१० नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शस्त्रास्त्रे खाली ठेवली होती.