Premium|Study Room : MPSC-UPSC चालू घडामोडी २०२६

GalaxEye Mission Drishti Satellite Launch : दृष्टी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, पोर्टेबल MRIमुळे आरोग्यसेवेत क्रांती आणि पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकातील घसरण, भारताच्या तांत्रिक प्रगतीसोबत लोकशाहीसमोरील नवे प्रश्न
GalaxEye Mission Drishti Satellite Launch

GalaxEye Mission Drishti Satellite Launch

esakal

Updated on

१) दृष्टी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारताची आघाडीची अवकाश-तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनी बेंगळुरू येथील 'गॅलॅक्स आय'ने आपल्या महत्त्वाकांक्षी 'मिशन दृष्टी' या उपग्रहाचे 'फाल्कन ९' या 'स्पेसएक्स'च्या रॉकेटद्वारे ०३ मे २०२६ रोजी कॅलिफोर्नियातून प्रक्षेपण केले. 'मिशन दृष्टी' हा जगातील पहिला ऑप्टो-SAR उपग्रह आहे, ज्यामुळे कोणतेही हवामान, दिवस-रात्र पृथ्वीची स्पष्ट छायाचित्रे घेण्याची क्षमता त्याला प्राप्त होते. कंपनीच्या मते 'मिशन दृष्टी' हा उपग्रह 'इलेक्ट्रो-ऑप्टिकल' आणि'सिंथेटिक अॅपर्चर रडार सेन्सर्स'ना एकाच कार्यक्षम प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करतो. 'इलेक्ट्रो ऑप्टिकल सेन्सर्स' सूर्यप्रकाश आणि स्वच्छ आकाशात 'हाय रिझोल्युशन' प्रतिमा टिपतात, तर सिंथेटिक अॅपर्चर रडार कोणत्याही हवामानात आणि कोणत्याही वेळी प्रतिमा पुरवतात.

'दृष्टी' उपग्रहाची वैशिष्ट्ये

'दृष्टी' उपग्रह ढगाळ हवामान किंवा अंधारातही स्पष्ट चित्रे घेऊ शकतो. सुमारे १९० किलो वजनाच्या या उपग्रहात ड्युएल टेक्नोलॉजी यंत्रणा आणि मल्टिस्पेक्ट्ररल कॅमेरा आहे. त्यामुळे रंगीत आणि तपशीलवार प्रतिमा घेता येतात. सिंथेटिक अपरचर रडारमुळे (एसएआर) निरीक्षण क्षमतेत वाढ झाली आहे.

भारतासाठी महत्त्व

सीमाभागातील निगराणीसाठी हा उपग्रह उपयोगी ठरेल. दहशतवादी हालचाली, लष्करी हालचाली आणि तेथील पायाभूत सुविधांवर लक्ष ठेवणे सोपे होईल. यामुळे भारताच्या निगराणी क्षमतेत वाढ होईल आणि ढगाळ हवामानात किंवा रात्रीच्या वेळीही निरीक्षण करता येईल. हा प्रकल्प भारताच्या अवकाश क्षेत्रातील खासगी कंपन्यांची ताकद दाखवणारा आहे. 'इस्रो'च्या व्यतिरिक्त आता खासगी स्टार्टअपदेखील अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करीत असल्याने या क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com