

Gauri Ganpati folk culture
E sakal
Gaurai Festival Maharashtra: When a Goddess Returns to Her Maternal Home
श्रीगणेशाचे आगमन झाल्यानंतर घरातल्या आयाबाया वाट बघतात ती गौरीची. गणपती १० दिवसांचा मानकरी पण गौराबाय मात्र ३ दिवसांचीच पाहुणी. या गौरीकडे माहेरवाशीण लेक म्हणून पाहिलं जातं.
वर्षभर सासरी राबराब राबणाऱ्या कष्टकरी स्त्रीचंच ते एक प्रातिनिधिक रूप. लोकसंस्कृतीच्या अंगाने या सणाकडे पाहताना जाणवतं की, या सणाच्या निमित्ताने गुंफलेली लोकगीतं म्हणजे केवळ देवादिकांची स्तुती नाही; तर ती तत्कालीन कृषिसंस्कृती, स्त्रीचं शोषण आणि तिच्या कोंडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणारी एक सशक्त सामाजिक अभिव्यक्ती आहे.
या सणात गुंतलेला हा लोकसंस्कृतीचा गोफ उलगडून दाखवला आहे, अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी.