Premium|Gen Z Automobile Trends : जेन झीच्या वाहनखरेदीचा बदलता ट्रेंड; अनुभव आणि तंत्रज्ञानाला महत्त्व

Gen Z Automobile Preferences : वाहनखरेदीकडे पाहण्याचा तरुणाईचा बदलता दृष्टिकोन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, आकर्षक डिझाइन, सुरक्षितता, डिजिटल सुविधा आणि किफायतशीरपणाला मिळणारे महत्त्व.
Gen Z Automobile Preferences

Gen Z Automobile Preferences

esakal

Updated on: 

अरविंद रेणापूरकर - arvindrenapurkar@gmail.com

मुंबईच्या रस्त्यांवरून गोव्याच्या दिशेने निघालेली एक मोटार... तीन मित्र... गप्पा, मस्ती आणि कानावर पडणारे शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘दिल चाहता है’ हे गाणे... २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने गाडीला केवळ प्रवासाचे साधन म्हणून दाखवले नाही; ती मैत्री, स्वातंत्र्य आणि तरुणाईच्या स्वप्नांचे प्रतीक बनली. दोन दशकांनंतर रस्ता तोच आहे; पण गाडीकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन बदलला आहे.

आजच्या ‘जेन झी’साठी वाहन म्हणजे केवळ घरापासून कार्यालयापर्यंत पोहोचण्याचे साधन नाही. ते व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे, तंत्रज्ञानाचा अनुभव आहे आणि जीवनशैलीशी जुळणारे स्मार्ट साधन आहे. मोटार असो किंवा दुचाकी, तिचे डिझाइन, फीचर्स, कनेक्टिव्हिटी, सुरक्षितता आणि डिजिटल अनुभव यांना आता वेगळे महत्त्व आले आहे. भारतात ‘जेन झी’ची संख्या मोठी आहे. आज ही पिढी वाहनखरेदीचा अंतिम निर्णय घेत नसली, तरी कुटुंबातील वाहनाच्या निवडीत तिचा प्रभाव वाढत आहे. उद्याच्या वाहन बाजारातील मोठा ग्राहकवर्ग म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.

काही दिवसांपूर्वी ‘ऑटो टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवरट्रेन समिट २०२६’मध्ये बोलताना इंडिया यामाहा मोटार समूहाचे अध्यक्ष हाजिमे आओटा यांनी ‘जेन झी’ ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांवर प्रकाश टाकला होता. त्यांच्या मते, देशातील तरुणाई वाहनांकडे केवळ प्रवासाचे साधन म्हणून पाहत नाही; वाहन त्यांच्या आकांक्षांची ओळख बनत आहे. त्यामुळे वाहनाची कामगिरी आणि भाव याबरोबरच डिझाइन, डिजिटल सुविधा, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि वाहनातून मिळणारा अनुभव यांना महत्त्व आले आहे. डिजिटल तंत्रज्ञानासोबत वाढलेल्या या पिढीसाठी कनेक्टिव्हिटी ही आता प्रीमियम सुविधा नसून, अपेक्षा बनली आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनसोबत किफायतशीरपणाही भारतीय ग्राहकांसाठी महत्त्वाचा आहे, असे त्यांनी नमूद केले.

Loading content, please wait...