
डॉ. शुभांगी पारकर
pshubhangi@gmail.com
एका अहवालानुसार भारतात २०२२ मध्ये तब्बल ७२ टक्के पुरुषांनी आत्महत्या केल्या. ‘पुरुष कधीही बळी नसतात, ते फक्त हिंसक असतात’ अशा चुकीच्या समजुतीमुळे त्यांच्यावरील हिंसा दुर्लक्षित होते. विवाहित पुरुषांनीही लिंगाधारित हिंसेचा अनुभव घेतल्याचे धक्कादायक चित्र आहे. पुरुषांच्या वेदनाही ऐकायला हव्यात...
लिंगाधारित हिंसाचार म्हटले, की बहुतेकदा महिलांवरील अत्याचार समोर येतात आणि तो समाजाचा खरोखर गंभीर प्रश्न आहे. मात्र, हाच लिंगाधारित हिंसाचार पुरुषांवरही होतो, हे फारसे कुणाला माहीत नाही आणि ते कुणी स्वीकारतही नाही. पुरुषांवर होणाऱ्या शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि आर्थिक अत्याचारांच्या घटनाही वास्तव आहेत; पण त्यांच्या बाबतीत समाजात फारसा विचार केला जात नाही.