
ऋषिराज तायडे
rushirajtayde@gmail.com
तब्बल १३ लाख मुलांमध्ये एकालाच होणारा आणि त्या आजाराबाबत इंटरनेटवर माहिती घेतली असता, मृत्यू वा यकृत प्रत्यारोपण हेच दोन पर्याय समोर येतात. अशा या दुर्मिळातील दुर्मिळ ‘सीपीएस-१’ आजारावर जगात प्रथमच जीन-एडिटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे या क्रांतिकारी उपचारात भारतीय वंशाच्या डॉ. किरण मुसुनुरू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.