
AI Privacy
esakal
संमतीशिवाय ‘सर्जनशीलता’ म्हणजे अतिक्रमणच. ‘कृत्रिम प्रज्ञे’मुळे हा धोका निर्माण झाला आहे. त्याचे स्वरूप ओळखून त्याविषयी सर्वांनीच जागरूक होण्याची गरज आहे. तसे झाले तरच नियमन परिणामकारक होऊ शकेल.
ए का ‘जेनझी’ युवतीने सध्या लोकप्रिय असलेल्या ‘साडी ट्रेंड’ मध्ये भाग घेतला. तिने ‘जेमिनी’ एआयला तिचा एक फोटो दिला आणि त्याला साडीमध्ये एक सुंदर प्रतिमा तयार करण्यास सांगितले. ‘जेमिनी’ने तिची सुंदर प्रतिमा तयार केली; पण त्या प्रतिमेत एक अशी गोष्ट होती, जी पाहून त्या महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. ‘एआय’ने तिच्या गळ्यावर एक तीळ रेखाटला होता. आश्चर्याची आणि भीतीची गोष्ट ही होती की, तिने दिलेल्या मूळ फोटोमध्ये तिने टी-शर्ट घातला होता आणि तो तीळ त्या टी-शर्टखाली पूर्णपणे लपलेला होता!