
AI Creativity
esakal
नवनिर्मितीच्या पुरात वाहून जाताना मी आनंदी आहे का दुःखी याचा नीटसा उलगडा होत नव्हता, खरंतर अजूनही होत नाहीये. सद्यःस्थितीत कला क्षेत्रातल्या या नवीन वादळी बदलाबरोबर जगण्याची ‘कला’ अवगत करणं हाच एकमेव पर्याय आहे, असा निष्कर्ष काढून मी माझं समाधान करून घेतलंय!
हे चित्र म्हणजे माझ्या मनातून उमटलेलं पण माझ्या बोटांतून न उतरलेलं... म्हटलं तर माझं, पण मी न काढलेलं चित्र. साधी (किंवा डिजिटल) पेन्सिलसुद्धा न वापरता काढलेलं हे चित्र म्हणजे मी ‘काढून’ घेतलेलं रेखाचित्र आहे. पण मी सोडून दुसऱ्या कोणाही व्यक्तीला या चित्राचं श्रेय घेता येणार नाही, हे नक्की. मग श्रेय नामावलीत उरतो फक्त मीच!
हे सगळं गोंधळात टाकणारं वाटतंय ना? तसं क्लिष्ट आणि अवघडच कोडं आहे हे. जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (जेन एआय) या नवनिर्मात्याची अस्वस्थ करणारी गोष्ट...