
Israel-Hamas conflict
esakal
निखिल श्रावगे
‘हमास’ या दहशतवादी गटाने ऑक्टोबर २०२३मध्ये इस्राईलवर हल्ला करीत सुमारे १२०० जणांचा बळी घेत इस्राईलच्या सुमारे २५० नागरिकांचे अपहरण केले होते. या भीषण हल्ल्याचा वचपा काढायच्या विचाराने पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझास्थित ‘हमास’वर हल्ल्यांचा सपाटा लावला आहे.
इ स्राईल आणि ‘हमास’मध्ये समझोता करायचा प्रयत्न सुरु असतानाच गेल्या आठवड्यात इस्राईलने कतारची राजधानी असलेल्या दोहा शहरात आलेल्या ‘हमास’च्या शिष्टमंडळावर हल्ला करीत सहा जणांना मारले. केलेल्या या हल्ल्यामुळे इस्राईलला कितपत शांतता संवाद करायचा आहे असा प्रश्न पडतो. या घटनेमुळे पश्चिम आशियाई देशांची चुळबुळ सुरु झाली आहे.