
कोणत्याही कामात तुमचा वाटा एकतर खारीचा असतो किंवा सिंहाचा. तो असतो खारीसारखाच छोटासा किंवा जंगलाच्या अनभिषिक्त सम्राटासारखाच दमदार, डोळे दिपवणारा! पण प्राण्यांच्या वागणुकीचा अंदाज असणाऱ्या एखाद्या प्राणीप्रेमी माणसाला विचारा, तो सांगेल या दोन्ही प्रकारच्या कॉन्ट्रिब्यूशन्सबद्दल आपल्याला साधारणपणे जे वाटतं ते काही तितकंसं बरोबर नाही. खारीचा वाटा फक्त छोटा नसतो, तर काम पूर्ण व्हावं म्हणून केलेला तो प्रामाणिक प्रयत्न असतो आणि सिंहाचा वाटा म्हणजे तर कष्ट न करता केलेला निव्वळ रुबाब. शिकार कळपातल्या सिंहिणींनी करायची आणि त्यातला मोठा वाटा मात्र सिंह महाराजांचा!!