Premium|Study Room : लैंगिक समानतेचे अपूर्ण चित्र; सर्वोच्च पदांपासून तळागाळापर्यंतचा महिलांचा संघर्ष

Glass Ceiling : काचेचे छत भेदून काही महिला सर्वोच्च पदांवर पोहोचल्या असल्या, तरी बहुसंख्य महिला आजही ‘चिकट तळा’मुळे कमी वेतन, मर्यादित संधी आणि संरचनात्मक अडथळ्यांमध्ये अडकलेल्या आहेत.
Glass Ceiling

Glass Ceiling

esakal

Updated on

लेखक : निखिल वांढे

मार्च २०२३ मध्ये, फाल्गुनी नायर यांनी 'नायका' (Nykaa) साम्राज्याची उभारणी करून भारताची सर्वात श्रीमंत स्वयंभू महिला अब्जाधीश म्हणून स्थान मिळवले आणि हे यश काचेचे छत भेदल्याचा पुरावा म्हणून जगभरात साजरे केले गेले. परंतु, याच काळात भारतातील महिला कामगार शक्ती सहभाग दर केवळ २५ ते ३२ टक्क्यांच्या आसपास होता. यावरून हे स्पष्ट होते की, मोजक्या महिलांनी सर्वोच्च पदे मिळवली असली, तरी बहुतांश महिला 'चिकट तळ' (sticky floor) या संकल्पनेमुळे तळाशीच अडकल्या आहेत. हा विरोधाभास कामाच्या ठिकाणी असणाऱ्या लैंगिक असमानतेच्या आकलनातील महत्त्वपूर्ण बदलाकडे निर्देश करतो. केवळ उच्चभ्रू महिलांना सर्वोच्च पदांवर पोहोचण्यापासून रोखणाऱ्या अडथळ्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, सर्वसामान्य महिलांना त्यांच्या सर्व प्रयत्नांनंतरही कमी पगाराच्या आणि प्रगतीची संधी नसलेल्या नोकऱ्यांमध्ये कोंडून ठेवणाऱ्या संरचनात्मक मर्यादा ओळखण्यावर भर दिला गेला आहे.

हा निबंध या दुहेरी वास्तवाचे विश्लेषण करतो. भेदलेल्या काचेच्या छताद्वारे झालेली प्रगती, बहुसंख्य महिलांना जखडून ठेवणारा चिकट तळ, त्याची मूळ कारणे आणि व्यापक लैंगिक समानतेसाठी आवश्यक उपाययोजनांचा यात अभ्यास केला आहे.

काचेचे छत हे पात्रता आणि क्षमता असूनही महिलांना वरिष्ठ नेतृत्व पदांवर पोहोचण्यापासून रोखणाऱ्या अदृश्य अडथळ्यांचे वर्णन करते. मात्र, गेल्या काही दशकांत हे छत अनेक क्षेत्रांत यशस्वीरित्या भेदले गेले आहे. राजकीय नेतृत्वात इंदिरा गांधी यांच्यापासून ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यापर्यंतच्या कार्यकाळाने सर्वोच्च पातळीवर महिलांची अफाट नेतृत्व क्षमता सिद्ध केली आहे. व्यावसायिक क्षेत्रातही इंद्रा नुयी, अरुंधती भट्टाचार्य आणि किरण मजुमदार-शॉ यांनी नवे मानदंड प्रस्थापित केले असून, 'फॉर्च्यून ५००' कंपन्यांमधील महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संख्या १९९६ मधील २ वरून २०२३ मध्ये ५३ वर पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com