

Global Interest Rate Hikes
esakal
कौस्तुभ केळकर - kmkelkar@rediffmail.com
जगातील अनेक प्रमुख मध्यवर्ती बँकांनी व्याजदरवाढीचा निर्णय घेतल्याने वित्तीय बाजारात ‘महाग पैशाचे पर्व’ पुन्हा प्रभावी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याचा परिणाम रोखे परतावा (बाँड यिल्ड), डॉलर, रुपया, परदेशी भांडवली प्रवाह आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावर होऊ शकतो. या सर्व घडामोडींचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर व्यापक परिणाम होतील. या पार्श्वभूमीवर, रोखे परतावा वाढण्याची कारणे, आपल्या अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, भारतीय रिझर्व्ह बँकेपुढे कठीण निर्णय घेण्याची कसोटी आदी विविध मुद्द्यांचा परामर्श.
जगातील अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांतील स्वस्त पैशाच्या पर्वातून हळूहळू बाहेर पडताना दिसत आहे. महागाईचा दबाव, कच्च्या तेलाच्या किमती, सरकारी कर्जाचा वाढता बोजा आणि भू-राजकीय अस्थिरता यामुळे प्रमुख मध्यवर्ती बँकांसमोर पुन्हा एकदा व्याजदर उच्च पातळीवर ठेवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने सप्टेंबरमध्ये व्याजदर ०.२५ टक्क्याने वाढवून ३.७५ ते ४ टक्के केला. त्यानंतर बँक ऑफ जपाननेही दर १.२५ टक्क्यांवर नेला, तर युरोपियन सेंट्रल बँकेने ०.२५ टक्क्याने दरवाढ केली. या निर्णयांमुळे जागतिक वित्तीय बाजारात ‘महाग पैशाचे पर्व’ पुन्हा प्रभावी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याचा परिणाम रोखे परतावा (बॉँड यिल्ड), डॉलर, रुपया, परदेशी भांडवली प्रवाह आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावर होऊ शकतो.