Premium|Commercial LPG Cylinder Rationing : गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय संकटात, कर्मचारी कपात टळली

Hotel Business Crisis : इराण-अमेरिका युद्धामुळे आखाती देशांतून होणारा गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून देशातील हॉटेल व्यवसायावर संकट ओढवले आहे. सिलिंडर रेशनिंगमुळे हॉटेलचालकांना काळ्या बाजारातून महागडे सिलिंडर खरेदी करावे लागत असून अनेक कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Commercial LPG Cylinder Rationing

Commercial LPG Cylinder Rationing

esakal

Updated on

कृष्ण जोशी - sarkarnama@esakal.com

अमेरिका-इराण युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने त्याचा एक वेगळाच फटका देशातील हॉटेल-रेस्टॉरंट आणि त्यांच्यावर पोट अवलंबून असलेल्या श्रमिकांना बसत आहे. आखाती देशातून होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हॉटेलचालकांना अभूतपूर्व अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. व्यावसायिक सिलिंडर ग्राहकांसाठी मर्यादित कोटा देण्याचे सरकारने जाहीर केले आहे व गॅस एजन्सी त्यानुसार तसे रेशनिंग करत आहेत. अशा स्थितीत काही ठिकाणी हॉटेलचालकांना जास्त रक्कम देऊन काळ्या बाजारात सिलिंडर घ्यावे लागत आहेत. अनेक लहानमोठ्या हॉटेलचालकांनी आपल्या मेनूमध्ये कपात केली आहे. ग्राहक कमी झाल्यामुळे काही ठिकाणी काही कर्मचारीदेखील अतिरिक्त ठरले आहेत. मात्र त्यांना काढूनही टाकता येत नाही. त्यामुळे ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ अशी हॉटेल चालकांची अवस्था झाली आहे. काही हॉटेल चालकांनी किंचित दरवाढही केली आहे. असे करून अनेक हॉटेलचालक कसेतरी परिस्थितीला तोंड देत आहेत. मात्र आणखी दोन-तीन आठवडे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आणखी बिकट परिस्थिती उद्भावेल, असे हॉटेल व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

Commercial LPG Cylinder Rationing
Latest Marathi Update : आज कुठे काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com