
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
कोरोनाच्या महामारीमुळे रशिया युक्रेन युद्ध यामुळे संपूर्ण जग गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तथापि, तुलनात्मकदृष्ट्या विचार केल्यास पश्चिम युरोपीय देश आणि अमेरिका यांना कोरोनाचा आणि रशिया युक्रेन युद्धाचा फटका सर्वाधिक बसलेला आहे.
पूर्व आशियाई देशांच्या तुलनेत या देशांच्या अर्थव्यवस्था अधिक डबघाईला आल्या आहेत. जपान, दक्षिण कोरिया, दक्षिण पूर्व आशियाई देश, चीन यांवर या संकटाचा प्रभाव तुलनेने कमी झालेला आहे.