Gold price rise
esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium|Gold price rise : सोन्यातील गुंतवणूक अजूनही फायद्याची?
Gold investment : डॉलरची कमजोरी, डी-डॉलरायझेशन, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि भू-राजकीय अनिश्चितता यामुळे सोन्याची ऐतिहासिक तेजी झाली असून २०२६ मध्येही भाव चढे राहण्याची शक्यता आहे.
मुकुंद बी. अभ्यंकर- mbabhyankar@gmail.com
भारतीयांची आणि त्यातही महिलांची सोन्याबद्दलची ओढ किती बरोबर होती हे गेल्या वर्षभरात सोन्याच्या भावात झालेल्या प्रचंड वाढीमुळे सिद्ध झाले. देशाच्या संपत्तीचा विचार केल्यास भारतीयांच्या सोन्यावरील प्रेमामुळे अनेक वर्षांपासून कमी किमतीला आयात केलेले सोन्याचे मूल्य सध्याच्या तेजीमुळे अनेक पटीने वाढले आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदाराने सोन्यात गुंतवणूक करावी का व येत्या वर्षात सोन्याचे भाव चढे राहतील का, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी सोन्याच्या भावात प्रचंड वाढ का झाली आणि तशी परिस्थिती येत्या काळात राहण्याची शक्यता किती आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

