
From Virtual to In-Person: How Google and Other Companies Are Redefining Hiring
एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता सगळ्याच क्षेत्रांत येणार आणि नोकऱ्या घालवणार असं आपण कायमच ऐकतो. पण आता वेगळंच होतंय. चक्क गुगल त्यांच्या एका कामातून एआयला डच्चू देण्याचा विचार करत आहे.
गुगलने एआय पॉवर्ड हायरिंग्ज सुरू केले होते. म्हणजे भरतीप्रक्रियेत एआयच्या सहाय्याने मुलाखती घेतल्या जात होत्या. पण ते काही फारसं उपयोगी पडत नाहीये. उलट उमेदवार गुगलला फसवतायत असंच दिसतंय. त्यामुळे मग एआयऐवजी गुगल पुन्हा एकदा मानवी मुलाखतींकडे वळत आहे.