Premium|Government Bonds in India : सरकारी कर्जरोख्यांत गुंतवणूक कशी करावी सुरक्षिततेसोबत मिळवा नियमित उत्पन्न

Government Bonds and Investment : शेअर बाजारातील चढ-उतारांमध्ये सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित व्याज उत्पन्नाचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी सरकारी कर्जरोखे महत्त्वाचे ठरू शकतात. त्यांचे प्रकार, वैशिष्ट्ये, खरेदी-विक्रीची पद्धत आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घ्या.
Government Bonds in India

Government Bonds in India

esakal

Updated on: 

जयंत काकतकर - kakatkars@yahoo.com

शेअर बाजारातील चढ-उतार आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांसमोर सुरक्षिततेसोबत नियमित उत्पन्न देणाऱ्या पर्यायांचा शोध घेण्याचे आव्हान असते. अशा वेळी केंद्र आणि राज्य सरकारांकडून जारी केलेले कर्जरोखे हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी तुलनेने सुरक्षित आणि नियमित व्याज उत्पन्न देणारा पर्याय ठरू शकतो. सरकारी कर्जरोख्यांचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये, खरेदी-विक्रीची पद्धत आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेऊया.

प्रत्येक व्यक्तीला गुंतवणूक करताना दोन प्रमुख बाबींचे आकर्षण अथवा महत्त्व असते. एक म्हणजे गुंतवणुकीवरील परतावा अन्य कोणत्याही मार्गापेक्षा अधिक मिळावा, अशी अपेक्षा; आणि दुसरी म्हणजे केलेली गुंतवणूक सुरक्षित राहावी, अशी अपेक्षा. सरकारी कर्जरोख्यांमधील गुंतवणूक या दोन्ही अपेक्षांची पूर्तता करणारा पर्याय ठरू शकते. अर्थात, अशा गुंतवणुकीमध्येही ठरावीक कालावधीसाठी बाजारभावाची जोखीम असू शकते. परंतु, मुदतपूर्तीपर्यंत कर्जरोखा धारण केल्यास मूळ मुद्दल परत मिळते. त्याचबरोबर बँकांप्रमाणेच अपेक्षित विशिष्ट दराने व्याजाचे उत्पन्नही मिळत राहते. अशा अर्थाने सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी काहीसा अल्पपरिचित असलेला सरकारी कर्जरोख्यांमधील गुंतवणुकीचा पर्याय निश्चितच विचार करण्यासारखा आहे.

Government Bonds in India
Premium|Gen Z Women : जेन झी मुलींची पैशाकडे पाहण्याची दृष्टी बदलतेय; आर्थिक स्वावलंबनाचा नवा प्रवास
Loading content, please wait...