Premium| Maharashtra Housing Scheme 2025: सरकारच्या ७०,००० कोटींच्या योजनेत माझं घर घेणं मला शक्य होईल का..?

MHADA CIDCO lottery: सरकारी सोडतीत घर मिळवण्यासाठी केवळ अर्जच नाही तर आर्थिक नियोजन, कर्ज व्यवस्थापन आणि चिकाटीही महत्त्वाची आहे. अनेकांनी अशा योजनांतून घर मिळवलेले उदाहरणं आहेत
MHADA CIDCO lottery homes

MHADA CIDCO lottery homes

esakal

Updated on

मुंबई: माझा पगार महिन्याला ४० हजार, बायकोचा २० हजार. महिन्याकाठी फक्त दहा ते बारा हजार रूपये बाजूला पडतात. ते साठवलेले पैसे देखील कधी कधी मोठा दवाखाना आला की जातात. माझ्या भाड्याच्या घरात सर्व सुखसोयी आहेत. फ्रीज, टीव्ही, अगदी एसी सुद्धा आहे. पण माझं घर घ्यायचं स्वप्न मला अजूनही आवाक्याबाहेरचं वाटतं. चाळीशीच्या जवळ पोहोचलेला स्वप्नील सांगत होता. आता रिटायरमेंट जवळ आली. म्हातारपणाच्या खर्चाचं नियोजन करावं का घराचं स्वप्न पूर्ण करावं.. अशा द्विधा मनस्थितीत तो अडकला आहे.  

खरं तर स्वप्नीलप्रमाणेच प्रत्येक मराठी माणसाचं एक स्वप्न असतं  की, माझं हक्काचं घर' असावं.  महागाईच्या या काळात हे स्वप्न पूर्ण करणं खरंतर कठीणच. पण त्यातूनही सरकारी योजनांचा लाभ घेत हे स्वप्न पूर्ण करणं शक्य होऊ शकतं.

पण सरकारी योजना थोड्या आणि अर्ज करणारे लोकं लाखोंच्या घरात.. असा विचार करून आधीच हातपाय गाळून माघार घेण्यापेक्षा या योजना नीट समजून घेणे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करणे, त्यासाठी हार न मानता सातत्याने प्रयत्न करणे आणि कागदपत्र तयार ठेवणे. या गोष्टींनी तुमचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने तुम्ही सुरूवात करू शकता.

महाराष्ट्र शासनाने 'माझे घर, माझा हक्क' या नावाने एक महत्त्वाकांक्षी धोरण हाती घेतलं आहे. या योजनेंतर्गत तब्बल ३५ लाख घरे आणि ₹ ७०,००० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. पण केवळ सरकारी लॉटरीवर अवलंबून न राहता, या संधीचं सोनं करण्यासाठी गृहकर्ज आणि अनुदानाचं  गणित कसं जुळवायचं, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या सकाळ+ च्या विशेष लेखातून या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com