

Governor address controversy India
esakal
विधिमंडळाच्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. मात्र, दक्षिणेतील कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या तिन्ही राज्यांमध्ये राज्यपालांच्या या अभिभाषणावरून वाद झाले. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपविरोधी पक्षांचे सरकार असून, राज्यपालांनी अभिभाषणातील मुद्द्यांमध्ये बदल केल्यावरून किंवा काही भाग वगळल्यावरून हा वाद सुरू झाला आहे.
वाद कर्नाटकी- मल्लिकार्जुन मुगळी
कर्नाटक हे केंद्रातील सत्तेच्या विरोधात कौल देण्याची परंपरा असलेले राज्य आहे. त्यामुळे येथे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात तणाव निर्माण होणे नवे नाही. मात्र, २२ जानेवारी रोजी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात अभिभाषण करण्यास नकार देत सभागृहातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय घेतल्यामुळे कर्नाटकातील काँग्रेस सरकार व राज्यपाल यांच्यातील संघर्ष आणखी टोकदार झाला आहे. गुरुवारी विधानसभेत घडलेल्या नाट्यमय घटनांनी केवळ राजकीय वातावरण तापवले नाही, तर राज्यपालांची भूमिका, त्यांचे अधिकार आणि घटनात्मक संकेत यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राज्यपाल सभागृहातून बाहेर पडताना काँग्रेस आमदारांनी केलेला विरोध आणि त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बी. के. हरीप्रसाद यांचा सदरा फाटल्याची घटना यामुळेही संघर्षाची धार अधिक तीव्र होऊ शकते.