

Greenland minerals geopolitical conflict
sakal
व्हेनेझुएलाच्या पाठोपाठ अमेरिकेने आता आपला मोर्चा ग्रीनलँडकडे वळविला आहे. ग्रीनलँडच्या बर्फाखाली खनिजांचा न वापरलेला मोठा साठा आहे. अमेरिका त्यावर हक्का सांगू पाहत आहे. त्यांच्या या विचाराला विरोध वाढत आहे, त्याचबरोबर त्या भागातील तणावही वाढत आहे. जगभरातील ऊर्जानियंत्रणाच्या विचारातून ही खेळी खेळली जात आहे.
आर्क्टिक भाग वेगाने बदलत आहे. तेथील बर्फाचे थर वेगाने वितळत आहेत. महत्त्वाच्या खनिजांची जगभरातील मागणी वाढत आहे आणिa लोकसंख्येची घनता कमी असलेला ग्रीनलँड भूराजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी ओढला गेला आहे. ग्रीनलँडच्या पोटामध्ये अनेक दुर्मीळ खनिजे, ग्रॅफाईट आणि हायड्रोकार्बनचा साठा आहे. अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेमुळे ग्रीनलँडचे सरकार आणि अमेरिका यांच्यात राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे.