
Global political unrest
esakal
निळू दामले
तरुणांच्या आंदोलनामध्ये नेपाळमधील सरकारला पायउतार व्हावे लागले. हीच अस्वस्थता अन्य देशांमध्येही दिसत आहे. त्यामागील कारणे वेगवेगळी असली, तरीही सर्वच देशांतील जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामागे आर्थिक कारणे आहेत, अन्यही समस्या असून त्यांना सांस्कृतिक रंग देण्यात येत आहे. यातून या अस्वस्थतेमध्ये आणखी भर पडत आहे.
नेपाळमध्ये नऊ सप्टेंबर रोजी तरुणांनी संसदेला आग लावली, पंतप्रधान आणि अध्यक्षांच्या निवासस्थानांवर हल्ले केले. सरकार पडले. पंतप्रधान पळून गेला, लष्कराला देश ताब्यात घ्यावा लागला. या नाट्यमय घटनाक्रमाची मूळ पटकथा लंकेत लिहिली गेली.