
केदार चितळे
cmo@chitalebandhu.in
स्नॅकिंग म्हणजे संध्याकाळी किंवा अधल्यामधल्या वेळी झटपट भूक भागविणारे काहीतरी चटपटीत खाद्यपदार्थ खाण्याची पद्धत भारतीय मानसिकतेत आणि खाद्यसंस्कृतीत अगदी खोलवर रुजलेली आहे. वाढती शहरी लोकसंख्या, विकसनशील ग्राहकांच्या प्राधान्यक्रमांमध्ये होणारे बदल, वेळेचा अभाव, झटपट भूक भागविण्याची इच्छा आणि ‘रेडी टू इट’ खाद्यपदार्थांची वाढती उपलब्धता यामुळे भारतीय स्नॅक्स उद्योगात प्रचंड वाढ झाली आहे. ‘क्विक कॉमर्स’च्या उदयाने या क्षेत्राचा आणखी विस्तार केला आहे; तसेच नव्या संधी आणि आव्हानेदेखील निर्माण केली आहेत.