
Monthly Savings with GST
esakal
पुणे: भारत सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या नव्या ‘जीएसटी कर प्रणालीमुळे’ सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. पूर्वीच्या गुंतागुंतीच्या कररचनेऐवजी आता फक्त ५% आणि १८% अशा दोनच कर श्रेणी असणार आहेत. तर आलिशान आणि समाजासाठी हानिकारक वस्तूंवर ४०% डिमेरिट दर लावण्यात आला आहे.
या बदलामुळे किराणा, औषधे, वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तू, शेतीसाठी लागणारी साधने, शिक्षण साहित्य यांसारख्या वस्तू खरेदी करताना तुमचे भरपूर पैसे वाचणार आहेत. बऱ्याच वस्तूंवर आता केवळ ५% कर लागणार असल्याने प्रत्येक कुटुंबाची दर महिन्याला हजारो रुपयांची बचत होऊ शकते.
नेमक्या कोणत्या वस्तूंवर किती पैसे वाचणार? तुमचा महिन्याचा खर्च किती कमी होईल? सरकारने असा निर्णय घेतलाय, मग सरकारला नुकसान होणार नाही का? मग सरकारने असा निर्णय घ्यायचं कारण काय? असे प्रश्न तुम्हालाही पडलेत ना! काळजी करू नका, तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ‘सकाळ प्लस’च्या या विशेष लेखात मिळणार आहेत.