GST Reduction Benefits
esakal
Premium| GST Reduction Benefits: जीएसटी दरकपातीमुळे ग्राहकांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांना दिलासा! गाडी घेणं घर बांधणं आता झालं स्वस्त
भारतात नुकत्याच झालेल्या जीएसटी दरकपातीमुळे सर्वसामान्यांपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत प्रत्येकाला दिलासा मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अगदी साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, बिस्किटे, चॉकलेट्ससारख्या दैनंदिन वस्तूंपासून गाड्या आणि शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री पर्यंत सगळ्या वस्तू स्वस्त आणि परवडणाऱ्या होणार आहेत. घर बांधणी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातही खर्च कमी झाल्याने ‘हाउसिंग फॉर ऑल’सारख्या योजनांना गती मिळेल. या करकपातीचा थेट परिणाम म्हणजे ग्राहकांच्या खिशात अधिक पैसे उरणार आणि तो पैसा पुन्हा बाजारात खर्च होणार. परिणामी खरेदी, उत्पादन आणि रोजगाराच्या संधी या तिन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतील.
या बदलांचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारात आधीच दिसू लागला आहे. सेन्सेक्स, निफ्टी वाढले आहेत. तर ऑटो, एफएमसीजी आणि सिमेंट क्षेत्रातील शेअर्समध्ये लक्षणीय तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून देशांतर्गत मागणीमुळे अर्थव्यवस्था अधिक स्थिर होईल अशी अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते, या सुधारणांमुळे भारताची आर्थिक वाढ ६.५ टक्क्यांपर्यंत पोहचू शकते.
म्हणजेच, ही फक्त करकपात नाही तर अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देणारा निर्णय आहे. ग्राहकांचे जीवनमान उंचावणे, उद्योगांना चालना देणे आणि गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणे हे सर्व या एकाच पावलाने साध्य होणार आहे. तर आता सकाळ प्लसच्या या विशेष लेखात पाहूया या बदलांचे विविध क्षेत्रांवर नेमके कसे परिणाम होणार आहेत.