
एम. आनंद
नवी पिढी ही तरुण, महत्त्वाकांक्षी आणि आर्थिक क्षेत्रात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तत्पर आहे. पण आपल्या आकांक्षांची पूर्तता करताना, आपल्या प्रियजनांना आर्थिक सुरक्षा प्रदान करताना आर्थिक चुका टाळणे महत्त्वाचे आहे. या टप्प्यावर योग्य सुरुवात करणे अत्यंत आवश्यक आहे. जरी अनेक वित्तीय साधने उपलब्ध असली, तरी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे योग्य आयुर्विमा संरक्षण असणे गरजेचे आहे.