
US Immigration policy
esakal
अमेरिकेच्या प्रशासनाने ‘एच१बी’ व्हिसावरची फी आधीच्या दोनेक हजारांवरून थेट एक लाख डॉलरवर नेली. दरवर्षी अमेरिकेत सुमारे ८५ हजार नवीन ‘एच१बी’ व्हिसा दिले जातात, त्यातील ७० टक्क्यांहून अधिक भारतीयांना मिळतात. म्हणजे या फीचा रोख भारताच्या दिशेने आहे, हे स्पष्ट आहे. हे संकट मोठे असले तरी आपल्या नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या माध्यमातून जगावर राज्य करण्याची स्वप्ने भारताने बाळगायला हवीत. ‘ब्रेन ड्रेन’कडून ‘ब्रेन गेन’कडे जात नवा भारत घडवण्याची ही सुवर्णसंधीच ठरावी...
अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या आठवड्यात मोठा भूकंप आला. आधीच अमेरिकेने लागू केलेल्या आंतरराष्ट्रीय आयात शुल्क वादाने वातावरण तापलेले असतानाच ट्रम्प प्रशासनाने येथे येणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांचा व्हिसा, म्हणजे ‘एच१बी’वरची फी आधीच्या दोनेक हजारांवरून एकदम एक लाख डॉलरवर नेली. दरवर्षी सुमारे ८५ हजार नवीन ‘एच१बी’ व्हिसा दिले जातात, त्यातील ७० टक्क्यांहून अधिक भारतीयांना मिळतात. म्हणजे या फीचा रोख भारताच्या दिशेने आहे, हे स्पष्ट झाले.